रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून इंस्टाग्रामवर ओळख वाढवून 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने रांजनगाव पोलीस्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विधी संघर्ष 16 वर्षीय बालक आहे. आरोपीने 14 वर्षीय मुलीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून मैत्री करत तिला आपल्या राहत्या घरी मौजे कारेगाव ता. शिरूर जि पुणे येथील मल्हार हिल्स येथे नेले. ७ फेब्रुवारी व ६ मार्च रोजी दुपारच्या वेळी कारेगाव ता. शिरूर जि पुणे येथील मल्हार हिल्स येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने 14 वर्षीय अल्पवयीन (रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे) मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला.
मुलाने अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्राम वरुण तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर मुलीला कारेगाव येथील त्याच्या राहत्या घरी घेवुन गेला. “मी तुझ्यावर खुप प्रेम करतोय, तु मला खुप आवडतेस” असे म्हणुन जबरदस्तीने दोन वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
सदर गोष्ट कोणाला सांगितली तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर विभाग प्रशांत ढोले यांची घटनास्थळी भेट देली. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.