पुणे : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून देण्याच आश्वासन सरकारने लाडक्या बहिणींना दिलं होतं. आतापर्यंत या योजनेतून जुलै ते फेब्रुवारी अशा महिन्याचे दरमहा पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमाही करण्यात आले. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पंधराशे ऐवजी 2100 रुपये चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीची निराशा झाली असतानाच आता आणखीन एक धक्का लाडक्या बहिणींना बसणार आहे. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे या योजनेच्या रकमेत कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत 46 हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नसल्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत पडल्या आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २१०० रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले. मात्र आता आर्थिक संकट सरकारवर कोसळल असून या हप्त्याची वाढीव तरतूद केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल आहे.
या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चाही रंगली होती. अशातच आता या योजनेच्या वाढीव हप्त्याची तरतूद होणार नसल्याने लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान जागतिक महिला दिनादिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमाही करण्यात आला मात्र मार्च महिन्याच्या हप्त्याचं काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.