लोणी काळभोर, ता.23 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका भंगाराच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना राधाई मच्छी मार्केट परिसरात रविवारी (ता.23) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडे वस्तीच्या जवळ एक भंगाराचे गोडाऊन आहे. या गोडाऊन मधील भंगाराला आग लागली आहे. आग लागल्यानंतर आगीचे मोठमोठे लोट दिसू लागले आहेत. या गोडाऊन मध्ये ठेवलेले भंगार जळून खाक झाले आहे.
दरम्यान, या गोडाऊनच्या शेजारी विद्युत प्रवाह वाहत आहे. त्यामुळे या आगीमुळे तारा गरम होऊन तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अद्याप कोणतीही बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेली नाही.