यवत: यवत येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. येथे एका गटाने घरात घुसून महिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना यवत येथील हॉटेल श्रेयस येथे दि. 29 रोजी रात्री 08.45 च्या सुमारास घडली. याप्रकरणी करण शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यवत येथील हॉटेल श्रेयस येथे दि. 29 रोजी रात्री 08.45 च्या सुमारास अक्षय लकडे व इतर सहा जणांनी संगणमताने करण संतोष शिंदे यांस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर अनिकेत कदम याने सिमेंटचा ब्लॉक व सुनील कांबळे यांने विट डोक्यात मारून जखमी केले.
करण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय लकडे, सुदेश कानडे, अभिषेक माळवे, अनिकेत कदम, माउली बोडके, प्रवीण कांबळे (सर्व रा. यवत ) व एका अनोळखी व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज हे करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत, रात्री 10.45 च्या सुमारास संतोष शिंदे, शुभम मासुळे व इतर दहा ते बारा जणांनी संगनमताने तुमच्या मुलाने शुभम मासुळे याला मारहाण केली. असे म्हणून ज्येष्ठ नागरिक विष्णू बोडके , पत्नी व भाच्याची बायको यांना घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
शुभम मासुळे याच्या परत नादी लागल्यास तुम्हाला जीवे मारतो, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद विष्णू गणपत बोडके यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे. फिर्यादिवरुन संतोष शिंदे, शुभम मासुळे (दोघेही रा. इंदिरानगर, यवत) व इतर दहा ते बारा जणांविरोधात अनुसूचीत जाती जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस हे करत आहे