उरुळी कांचन, ता. 06 : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12 विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. अशी माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
महाविद्यालयातून एकूण 476 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 476 पैकी 476 विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
मृणाल राहुल जाधव 91.50,
कार्तिक अशोक गुप्ता 91.00 टक्के,
पूर्वा विशाल थोरात 88 टक्के,
श्रावणी सखाराम काळे 87. 33 टक्के,
जान्हवी प्रदीप कडुकर 86.67 टक्के,
दरम्यान, ज्युनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उरुळी कांचनसह परिसरातून कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थीच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, संचालक. डॉ. अप्पासाहेब जगदाळे, संपूर्ण स्टाप यांनी विद्यार्थांचे अभिनंद केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या