Daund News : दौंड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक गावोगावी साखळी उपोषण करत आहेत. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. असे असतानाही आरक्षणावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला खडसावले आहे. ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्या माध्यमातून मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? असा संतप्त सवाल विचारला आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. ते हक्क त्यांना मिळायलाच पाहिजेत, ओबीसी आणि आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर अशा अनेक समाजांना आरक्षण देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा
दौंडच्या दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी हे पत्रक वाचून दाखवले. राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळत असतील, तर महाराष्ट्रातील सामाजिक एकतेसाठी हे बाधक आहे. (Daund News) मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं, त्यासाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकं आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. फक्त योग्यवेळी आरक्षण देऊ ही त्यांची भाषा आहे. सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचं मन निर्दयी आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
जरांगे पाटील यांचे प्राण वाचावेत हेच आमचे मत आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा. (Daund News) शिवसेना फक्त समन्वयाची भूमिका घेत आहे. शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये, असा इशाराच त्यांनी दिला.
दरम्यान, दौंड दौऱ्यामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आम्ही मराठा आंदोलकांसोबत आहोत. (Daund News) आम्ही राजकारण करत नाही. कुणाला राजकारण करायचं असेल, तर ते मराठा समाजाशी करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे, असेही राऊत म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राहू बेटात कामाच्या शोधात हंगामापूर्वीच ऊस तोडणी कामगाराचे जत्थे दाखल
Daund News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवाशी जागीच ठार, १८ गंभीर