गणेश सुळ
Daund News : केडगाव : मराठा समाजातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठांकडून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दौंड तालुक्यातील विविध गावांमध्येन आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना बंदीचे फलक लावण्यात आले असून, साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे. खूटबाव गावात व्यापारी संकुल येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशेजारी लाक्षणिक साखळी उपोषण सुरू आहे.
राजकीय पुढाऱ्यांना बंदी
या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, (Daund News) ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, इत्यादी घोषणा देऊन उपोषणकर्ते पाठिंबा देत होते.
साखळी उपोषणाला सकाळी १० ते ५ या वेळात सुरूवात झाली. (Daund News) या वेळी खुटबाव गावातील सर्व सकल मराठा बांधव एकत्रितपणे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला खंबीरपणे साथ देऊन आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ केडगाव चौफुला येथे विविध कार्यक्रम
Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
Daund News : राहू बेटात कामाच्या शोधात हंगामापूर्वीच ऊस तोडणी कामगाराचे जत्थे दाखल