गणेश सुळ
Daund News : केडगाव : श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारनिमित्त दौंड तालुक्यातील मौजे देलवडी येथील जय मल्हार देवस्थान खंडोबा पालखी खांद्यावर घेऊन, सदानंदाचा येळकोट… अशी गर्जना करीत, भुलेश्वर डोंगरावर पायी जाताना सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधले होते. हे दृश्य पाहून भुलेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
खंडोबाच्या पालखीचे फुलांच्या वर्षावात स्वागत
देलवडी, वांजरवाडी, एकेरीवाडी, येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने भुलेश्वर मंदिरातील महादेवाचा अभिषेक, आरती पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. ही धार्मिक परंपरा ग्रामस्थ पूर्वीपासून जोपासत आहेत.
जेजुरी, देलवडी जय मल्हार देवस्थान, खंडोबाची पालखी सोहळ्यात समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा पोहोचला. मारुती मंदिरापासून जय मल्हार देवस्थानपासून खंडोबाची पालखी खांद्यावर घेऊन ग्रामस्थ डोंगरावर चालत श्री भुलेश्वर मंदिर येथे पालखी भेटीसाठी घेऊन गेले. (Daund News) देलवडी जय मल्हार देवस्थानचे पुजारी बबन दत्तोबा शिर्के यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री भुलेश्वर मंदिर येथे महादेवाचा अभिषेक, आरती पूजन झाल्यानंतर खंडोबाचा पालखी सोहळा, समस्त ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात पायी मार्गाने डोंगरावरून खाली उतरून, भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी श्री श्रीपतीराव दोरगे यांच्या घरी दुपारच्या (न्याहारी) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी यवत येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडोबाच्या पालखीचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. दोरगे परिवाराने खांदा देऊन पालखी घरापर्यंत आणण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते खंडोबाची आरती करण्यात आली. सदानंदाचा येळकोट, गर्जना करण्यात आली. उपस्थित भाविक-भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर पालखी वांझरवाडी येथील खंडोबा मंदिर याठिकाणी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. तेथील ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. (Daund News) त्यानंतर सर्व देलवडी परिसरातील महिला-भगिनींच्या वतीने सुबक रांगोळी काढून, पुष्पवृष्टी करून आपल्या नगरीत खंडोबा देवाचे दर्शन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास पालखी जय मल्हार मंदिर येथे पोहचली. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करून पुन्हा आरती करण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी देलवडी येथील अखिल बलुतेदार मंडळाचे मोठे सहकार्य लाभले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; निर्यात शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी
Daund News : खुटबाव येथे जनरीक मेडिकल सुरू करणार – माजी आमदार रमेश थोरात