Daund News : देऊळगाव राजे : देऊळगाव राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश अल्लमवार यांना शुक्रवारी (ता. ६) एका अघोषित महिला पुढार्याने केलेली शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोग्य केंद्रातील सर्व कर्मऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
देऊळगाव राजे येथे जाहीर निषेध
या प्रकरणी संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी सोमवारी (ता. ९) दौंड तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. (Daund News) या वेळी निषेध सभा देखील घेण्यात आली. या वेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन येडके व त्यांचे पदाधिकारी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन पांढरे, पुणे जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जगताप, समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे विविध कर्मचारी, महाराष्ट्र नर्सेस संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील आशा संघटनेचे पदाधिकारी, देऊळगाव राजे येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, देऊळगाव राजे येथील विविध संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन पांढरे यांनी सांगितले की, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व न्याय्य मार्गाने पाठपुरावा करीत राहू.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित महिलेविरुद्ध उद्या चार्ज शीट दाखल करणार आहोत.
– स्वप्नील जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंडजी घटना घडली आहे ती चुकीची असून, जिल्ह्यातील विविध संघटनांनी मला जो आत्मविश्वास दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आरोपीला त्वरित योग्य शिक्षा व्हावी, ही अपेक्षा आहे.
– डॉ. अविनाश अल्लमवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देऊळगाव राजे