Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हवेलीत मोजणीचं काम, अन् पत्रासाठी दोन वर्षं थांब”; काय आहे उरुळी कांचन येथील प्रकरण…वाचा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 March 2025, 18:35

संदीप बोडके 

लोणी काळभोर, ता. 3 : जमीन मोजणीसाठी ‘अतितातडी’ प्रकारातून शासकीय तिजोरीत रक्कम जमा करुन दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही मोजणी नकाशांचे पोट हिश्यांचे पत्रच अद्याप तयार केले नसल्याचा धक्कादायक प्रकार हवेली तालुक्यातील मोजणी कार्यालयात घडला आहे. शेतकऱ्याला तब्बल दोन वर्षे हेलपाटे मारूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. “हवेलीत मोजणीचं काम, अन् पत्रासाठी दोन वर्षं थांब” असे म्हणत शेतकऱ्याने आपली हतबलता “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे हवेली भूमि अभिलेखचे उपअधीक्षक अमर पाटील शेतकऱ्यांना आता तरी विलंब न लावता न्याय देणार का?  याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमि अभिलेख विभागातील कामकाजाबाबत प्राप्त तक्रारीवरून अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. मात्र, हवेली तालुक्यातील मोजणी कार्यालय महसूल मंत्र्यांनी दिलेले आदेश अंमलात आणताना दिसत नाही. दिरंगाईचा अति गलथान कारभार हवेली भूमी अभिलेख कार्यालयात सुरु आहे.

मौजे उरुळी कांचन येथील गट नबंर 1223 ची अतितातडी पोट हिस्स्यांची मोजणी (रजिस्टर नबंर 866/2023) जानेवारी 2023 मध्ये झालेली आहे. संबंधित पोट हिस्सा मोजणीची “क” प्रत नकाशा मार्च 2023 मध्ये मिळाला आहे. त्याबाबत गट नबंरमधील हिस्सेदाराच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नाहीत. मात्र, याला दोन वर्षं पूर्ण झाल्यानंतरही सातबारावर पोटहिस्सा करण्याबाबतचे पत्रच हवेलीच्या मोजणी कार्यालयाने अद्याप तयार केले नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, हे ‘कजाप’चे पत्र का व कशासाठी तयार केले नाही, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र या ‘कजाप’च्या पत्रकापोटी शेतकऱ्यांना दोन वर्षे हवेलीच्या मोजणी कार्यालयाने वेठीस धरले आहे.

मावळचा न्याय हवेलीला लागू होणार का?

दफ्तर तपासणीमध्ये दिरंगाई व शासकीय कर्तव्यात अनियमितता आढळल्याने मावळ तालुक्यातील परिरक्षक भूमापकाचे निलंबन झाले आहे. तसेच भूमापकाच्या कार्यालयीन कार्यविवरणावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपअधिक्षकांची असल्याने संबधित उपअधिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश भूमि अभिलेखचे पुणे येथील उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी जारी केले आहेत. त्याच धर्तीवर हवेली तालुक्यात ‘कजाप’चे पत्र देण्यास दोन वर्षं लावणाऱ्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी होणार का ? हा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

याबाबत बोलताना हवेली भूमि अभिलेख मुख्यालयाचे सहाय्यक विजय साबळे म्हणाले की, सदर प्रकरणात तांत्रिक अडचण असू शकते. मात्र, संबधित कार्यालयात त्याची योग्य माहिती मिळू शकते.

हवेली तालुका भूमीअभिलेख उपअधीक्षक अमर पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, उरुळी कांचन येथील ‘कजाप’चे काय प्रकरण आहे, ते पहिल्यांदा पाहतो. त्यानंतर अधिक माहिती देतो.

याबाबत बोलताना भूमापक अमोल कदम म्हणाले की, या प्रकरणाबाबत माहिती या आगोदरच मिळालेली आहे. त्याच्यावर काम सुरु आहे. सध्या मी उरुळी कांचन परिसरात काम करीत आहे. दोन दिवसात अर्जदाराला ‘कजाप’चे पत्र देण्यात येईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post

तक्रारवाडी येथे बौद्ध विहार सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये निधीचे भूमीपूजन

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.