अजित जगताप
violating the Right to Information Act : वडूज: सरकारमान्य शिधा वाटप कॅश मेमो, साठा नोंदणी वही व विक्री नोंदणी नक्कल मिळणे बाबत मार्च महिन्यामध्ये लेखी माहितीच्या अधिकारात मागणी केली होती. (violating the Right to Information Act) त्याबाबत अद्यापही माहिती न मिळालेली नाही. (violating the Right to Information Act) त्यामुळे वडूज येथील जनता दरबारात प्रांताधिकारी उज्वला गाडेकर व तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडे माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल कदम यांनी केली आहे. (Complaint in Janata Durbar that the supply branch at Vaduj is violating the Right to Information Act)
शिधा वाटप दुकानाबाबत अनेकदा तक्रारी करूनही गंभीर दखल घेतली जात नाही
दरजाई या गावात सरकार मान्य शिधा वाटप दुकान असून सदरच्या दुकानाबाबत अनेकदा वारंवार तक्रारी करूनही त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. ( violating the Right to Information Act) त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी अखेर माहितीचा अधिकार वापरून एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०२३ झालेल्या नियमित धान्य वाटपाचे कॅश मेमो व इतर कागदपत्राची नक्कल मिळण्यासाठी माहिती अधिकाराचा अर्ज केला आहे.
अर्ज करुन अडीच महिने होऊनही खटाव तहसील कार्यालय व पुरवठा शाखेने कोणतीही दखल घेतली नाही. ( violating the Right to Information Act) उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ही बाब आमदार महेश शिंदे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात मांडण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : वडुज येथे जन औषधी दिन, महिला दिन व मनसे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न …!