CM Eknath Shinde News : भीमाशंकर : भाविक श्रद्धेने आणि भक्तीभावाने भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असतात. येथे लाखो भक्त येत असल्याने, शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च केले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, अशा मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
भीमाशंकर येथे मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार
चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या वेळी त्यांनी, राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे… सर्वांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना केली. (CM Eknath Shinde News) भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
भीमाशंकर परिसरात पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. याप्रसंगी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक,(CM Eknath Shinde News) श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भीमाशंकर दौऱ्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुखमंत्री काल जी-२० साठी दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र, तंत्र, मंत्र जादूटोणा यामध्येच ते अडकले आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. (CM Eknath Shinde News) त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे, याविषयी मुख्यमंत्री काहीच बोलच नाहीत, अशी टीक शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. साताऱ्यात दंगलसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली? हे सरकारचं अपयश आहे.जी-२० परिषदेत जाऊन पार्ट्या झोडण्यापेक्षा सरकारने जालन्यात जावे. मनोज जरांगे पाटलांवर उपोषण करण्याची परिस्थिती का आली? हे पहावे, असेही राऊत म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
CM Eknath Shinde News : गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजीटल मॅपींग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे