Friday, May 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! ; पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार – आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 11 September 2023, 17:57

Breaking News : पिंपरी : – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाचा “जैसे थे” आदेश तब्बल 12 वर्षाच्या लढ्यानंतर उठवण्यात आला.

पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी अपेक्षा

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी 2014 पासून सुरू केलेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला. विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी सभागृहात वारंवार हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने हा ‘जैसे थे’ आदेश रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.

 

तत्कालीन राज्य सरकारने २०११ मध्ये या प्रकल्पला ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यामुळे सुमारे १७० कोटी रुपयांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नुकसान होण्याचा धोका होता आणि हा प्रकल्प मार्गी लागल्यास शहराचा किमान २०५० पर्यंतचा पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी ठाम भूमिका आमदार लांडगे यांनी जुलै-२०२३ मध्ये झालेल्या मुंबईतील अधिवेशनात मांडली होती. त्याला त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
याबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पामुळे शहराला सुमारे ४८ एमएलडी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. २०११ मध्ये हा प्रकल्प राज्य सरकारने ‘जैसे थे’ आदेश देऊन थांबवला होता. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने प्रकल्पाचा खर्च उभा करावा. पवना धरणातून बंधाऱ्यापर्यंत पाणी आणताना पाण्याचे होणारे प्रदूषण आणि पाण्याची बचत, प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि खर्च याचा विचार करता बंद जलवाहिनी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांना विचारात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करावे, अशी मागणी राज्य सरकारला करणार आहे.
**
प्रतिक्रिया:
पिंपरी- चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या याचा विचार करता आगामी ५० वर्षांचा विचार करुन नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध होण्यास चालना मिळाली. आता पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे कामही प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावे आणि पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी अपेक्षा आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्यातील महायुती सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याबद्दल पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लायन्स पॉईंटवर फोटो काढताना नौदलाच्या अधिकाऱ्याचा 250 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 28 May 2026, 20:56

पुण्यातील सेकंड-हँड वाहन व्यवहारांवर RTO ची करडी नजर, परवानगीशिवाय खरेदी-विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

Thursday, 28 May 2026, 20:02

कदमवाकवस्तीतील अपहरण प्रकरणाचा उलगडा; लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरूप सुटका

Thursday, 28 May 2026, 19:46

Baramati Crime News: टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटचा बारामती शहर पोलिसांकडून पर्दाफाश; 100 इंजेक्शनसह आरोपी जेरबंद..

Thursday, 28 May 2026, 19:37

…अखेर नायगावच्या बेपत्ता अल्पवयीन मुलाचा लागला शोध; लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन पोलिसांकडे केले सुखरूप सुपूर्त

Thursday, 28 May 2026, 19:26

“मी माझ्यासाठी लढत आहे का?” माजी सरपंचाची शेवटची पोस्ट अन् 4 जणांना जिवंत जाळले

Thursday, 28 May 2026, 18:57
Next Post

Loni Kalbhor News : लोणी स्टेशन परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची किराणा दुकानदाराला मारहाण ; मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.