Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीतील अपहरण प्रकरणाचा उलगडा; लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरूप सुटका

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 May 2026, 19:46

लोणी काळभोर, ता. २८ : कदमवाकवस्ती येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले असून, आरोपीला ताब्यात घेत अल्पवयीन मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरातून त्यांची १७ वर्षीय मुलगी  ही कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही. तिचा मोबाईल फोनही बंद लागत असल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. परिसरात शोधाशोध करूनही मुलगी मिळून न आल्याने अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या ३४ वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपीचे लोकेशन येळी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे मिळून आले. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार अण्णा माने, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

 

या पथकाने धाराशिव येथे जाऊन मोठ्या शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या संपूर्ण कारवाईमुळे लोणी काळभोर पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

पुण्यातील सेकंड-हँड वाहन व्यवहारांवर RTO ची करडी नजर, परवानगीशिवाय खरेदी-विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.