महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन निरगुडे यांनी राजीनामा दिला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या आधी देखील आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले होते.
विशेष म्हणजे मराठा आरक्षणावर विधिमंडळात चर्चा होणार आहे. त्या आधी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन, राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात या आधी देखील सरकारी हस्तक्षेपामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
निरगुडे यांचा राजीनामा मुख्य सचिव यांनी स्विकृत केला आहे. त्या अनुषंगाने OBC मंत्रालयातील अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी पत्रकान्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयास माहिती दिली आहे