Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता सुट्या पैशांची कटकट संपणार; एसटी बस होणार कॅशलेस, पुणे विभागात १४ आगारांत सुविधा सुरु!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 December 2023, 10:50

पुणे : बसप्रवासादरम्यान वाहक आणि प्रवाशांत सुट्या पैशांवरून हमखास वाद होतो. ‘प्रत्येकाला देण्यासाठी सुटे पैसे कोठून आणायचे,’ असा त्रागा वाहक करताना दिसतो, तर ‘आमच्याकडे सुटे पैसे नाहीत, आम्ही तरी कोठून देणार’ असा प्रवाशांचा सवाल असतो. यावर तोडगा काढतानाच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता बसमध्येच कॅशलेस व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या खिशात पैसे नसतानाही तुम्हाला एसटीने प्रवास करता येणार आहे. एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.

चहाची टपरी असो, पानटपरी, भाजीविक्रेता वा एखादा रिक्षाचालक, आजकाल सगळ्यांच्या मोबाइल फोनमध्ये डिजिटल पेमेंट वॉलेट, यूपीआय असल्यामुळे रोख पैशांची गरज कमी झाली आहे. विविध कंपन्यांच्या ‘यूपीआय’चे क्यूआर कोड स्कॅन करताच व्यावसायिकाला पैसे अदा होतात. मात्र, या तंत्रज्ञानाच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा एक पाऊल मागे होती. परंतु, आता ‘एसटी’चे तिकीटही कॅशलेस होणार आहे. महाराष्ट्रात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रत्येक शहरच नाही तर गावही जोडले गेले आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचा मोठा आधार वाटतो. आता परिवहन महामंडळ काळाप्रमाणे बदलत आहे. नवीन नवीन सुविधा एसटीत दिल्या जात आहेत. नवीन बसेसची खरेदी होत आहे. आता महामंडळ डिजिटल सुद्धा झाले आहे. एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

एसटी बसमध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट काढून बस प्रवास करता येणार आहे. पुणे विभागात ही सुविधा सुरु झाली आहे. पुणे शहरात यापूर्वीच पीएमपीएमएलने ही सुविधा सुरु केली होती. पुणे विभागात १८ ते २० हजार पेमेंट ऑनलाईनच्या माध्यमातून जमा होऊ लागल्याची माहिती शिवाजीनगर विभागाचे आगार प्रमुख ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे. आता कार्ड स्वॅप करुन तिकीट देण्याची पद्धत लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात सुट्या पैशांवरुन होणार वादही टळणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post
12 special Pune -Mau Kumbhmela train

धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं अन स्वत:ला डब्यात कोंडून घेतलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.