Breaking News : पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख राजाभाऊ भिलारे यांनी, ‘आपण कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही,” असे सांगत पदाचा राजीनामा दिला आहे. भिलारे यांनी शिंदे गटाची साथ सोडल्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात
दरम्यान, राजाभाऊ भिलारे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी देखील केली जात होती. मात्र, बुधवारी तातडीने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. (Breaking News ) ते कोणत्या गटात जाणार, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
राजीनाम्याबाबत बोलताना भिलारे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी शिवसेनेचे काम सुरु केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून काम करत होतो. (Breaking News ) हे काम करताना पदाधिकारी म्हणून मान, सन्मान, अपमान सर्व सहन केले. मी हे काम करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करावे.
राजाभाऊ भिलारे यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशची जबाबदारी होती. (Breaking News ) ते या संस्थांचे प्रचार आणि प्रसाराचे काम करत होते. शिंदे गटात सामील होणारे पुणे शहातील पहिले शिवसैनिक भिलारे हे होते.