पुणे : पुणे शहरातील भिडे वाडा विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 13 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आता लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील गाळेधारकांची याचिका फेटाळली आहे. सावित्रीबाई फुले यांचे स्मारक म्हणून भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू होणार आहे.
पुण्यातील भिडेवाड्यासंदर्भात तेथील स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पाठपुरावा केला होता.
अभिनंदन पुणेकर!
पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 16, 2023
पुण्यात स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात वाड्यातील भाडेकरूंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वाड्याची जागा ही स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल. मंत्री चंद्रकांत पाटलांनीही यावर पुणे महापालिका आणि नागरिकांचे अभिनंदन केलं आहे.