Big News : पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, आरोग्य विभागाच्या अभियंता आणि लेखापाल यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.13) ही कारवाई केली. आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी आठ हजार रुपये लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
याप्रकरणी मुख्याधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय 35), आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला राजेंद्र हरडे (वय 31), लेखापाल प्रवीण गणपत कापसे (वय 35) या सर्व अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. याबाबत 29 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. (Big News ) या तक्रारीच्या आधारे एलसीबीने ही कारवाई केली. तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत. त्यांनी राजगुरू नगरपरिषद, खेड येथील आरोग्य विभागाला लागणारे साहित्य पुरवले होते. त्याचे एकूण 80 हजार 730 रुपयांचे बिल त्यांनी नगरपरिषदेमध्ये सादर केले होते. हे बिल काढून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला हरडे यांनी 8 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
आठ हजारांची लाच देण्यास तक्रारदार यांनी असमर्थता दाखवल्याने त्यांनी याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.11) आणि मंगळवारी (दि.12) पंचासमक्ष पडताळणी केली असता चारुबला हरडे यांनी बिल मंजूर करण्यासाठी 8 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. (Big News ) पथकाने बुधवारी राजगुरुनगर नगरपरिषदेत सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना हरडे यांना रंगेहाथ पकडले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का; नियम न पाळल्याने ट्विटर अकाउंट सस्पेंड
Big News : मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं , पण ओबीसीतून नको : ॲड. महेश भागवत