Big News : पुणे : पुण्याची व्याप्ती वाढत असताना, विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी राहत आहेत. हे विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून अमली पदार्थ विक्रीचे गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. ससून रुग्णालय परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतीच कारवाई करून दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
बड्या तस्करासह तिघांना अटक
ससून रुग्णालय परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका बड्या अमली पदार्थ तस्करासह तिघांना ताब्यात घेतले आहे. अमली पदार्थ विरोधी कारवाई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत आहे. (Big News) त्यातून विविध प्रकारचे अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र, ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याबाबत मिळालेल्य अधिक माहितीनुसार, ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १३ मध्ये येरवडा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. (Big News) यामुळे हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.