Big Breaking : पुणे : पीएमपीएल चालकाने १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर रविवारी (ता.२२) सकाळी घडली आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या प्रकरणी आरोपी पीएमपीएल चालकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केली असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
नीलेश सावंत असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
चालकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील एका सिग्नलवर एमएच १४ एचयू ५७२५ क्रमांकाची पीएमपीएल ही बस चिंचवड गावाकडे प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी बसचालक नीलेश सावंत याने एका चारचाकी वाहनाला कट मारला. (Big Breaking ) त्या चारचाकी वाहन चालकाने त्याचा जाब आरोपी नीलेश सावंत याला विचारल्यावर रागाच्या भरात बस सेनापती बापट मार्गावर विरुद्ध दिशेने (राँग वे) बस चालवत नेली. त्याने वेताळ चौकाच्या परिसरात उलटी बस चालवत जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली.
हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड करत मदतीसाठी धावा सुरु केला. या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकत चालक निलेश सावंत पीएमपीएलची बस मागचापुढचा कोणताही विचार न करता चालवत होता. या अपघातामध्ये काही प्रवाशी आणि वाहनचालकांना दुखापत झाली आहे. (Big Breaking ) जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. तुर्तास कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, पोलिसांकडून आता चालक निलेश सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला असून तपास सुरु झाला आहे. (Big Breaking ) याप्रकरणात आता प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.