जीवन सोनवणे
Bhor News : भोर : भोंगवली (ता. भोर) येथील धेवडजाई लघुपाटबंधारे तलाव येथे शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी लावलेल्या मोटरची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. दोन महिन्यांत केबल चोरीची ही दुसरी घटना घडली आहे या घटनेने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
राजगड पोलीस ठाणे हद्दीतील पूर्व भागातील भोंगवली येथील शेतकरी श्रीकांत गुलाब निगडे (वय ३५) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर कॉपरपट्टी केबल, जयसिंग माधवराव निगडे (वय ७०) यांची चार हजार ८०० रुपयांची ८० मीटर केबल, विजय माधवराव निगडे (वय ६५) यांची चार हजार ८०० रुपयांची ८० मीटर केबल, महादेव सीताराम सुर्वे (वय ५८) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल, गणेश दत्तात्रेय सुर्वे (वय ४२) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल व सुहास शंकर सुर्वे (वय ५८) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल, अशी मिळून एकूण २६ हजार ४०० रुपयांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. (Bhor News) याबाबतची तक्रार राजगड पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी केली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर संकट
भोंगवली-भांबवडे नदी किनारी तसेच निरा नदी किनाऱ्याच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबलची चोरी मागील काही दिवसांपूर्वी झाली होती. याबाबत सर्व शेतकऱ्यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही. चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची कापूरहोळ येथे ग्रेट भेट; कार्यकर्त्यांना सुखद धक्का
Bhor News : वरंधा घाटात मिनीबस ६० फूट खोल दरीत कोसळली ; चालकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी..