जीवन सोनवणे
Bhor News : भोर : विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कोणती कौशल्ये नाहीत, यापेक्षा कोणती कौशल्ये आहेत यावर लक्ष केंद्रित करावे. आपल्याकडील कौशल्यांचा योग्य वापर करून, समाजातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल यांनी केले.
नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या डिप्लोमा विभागातर्फ़े अभियंता दिन साजरा
अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जयंतीदिन नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या डिप्लोमा विभागाच्या वतीने अभियंता दिन (ता. १५) म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल बोलत होते. (Bhor News ) याप्रसंगी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी (महिला) महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, प्राचार्य पंकज भोकरे, प्राचार्य किरण पवार उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. विठ्ठल बांदल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, सचोटी बाळगून आचरण करणे गरजेचे आहे. यशाला कष्टाशिवाय पर्याय नाही. (Bhor News ) आपले कर्तृत्वच आपले आत्मचरित्र असते. एखादी गोष्ट निर्माण करण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे नवनवीन गोष्टी स्वतः तयार करून निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा.
डॉ. अविनाश पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील ध्येय निश्चित करून वाटचाल करावी. निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची अपार कष्ट करण्याची मानसिक तयारी असली पाहिजे.
पोपटराव सुके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बदलत्या युगाचे तंत्रज्ञान आत्मसात करावे. तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून कौशल्यपूर्ण अभियंता तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुमित हिवाळे, रमेश कांबळे, अमृता वीर, राजश्री सावंत, आरती पवार यांनी परिश्रम घेतले. (Bhor News ) कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पंकज भोकरे यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ गोवेकर व राम घुगे यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हे दाखल..
Bhor News : खेड शिवापूर परिसरात मुरुम माफिया जोमात; अवैध उत्खननाला महसूल कर्मचाऱ्यांचा कृपाशीर्वाद?