Bhor news : भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे व सर्व संचालक मंडळ आणि राजगड कामगार संघटना यांच्यामध्ये गुरुवारी (दि. २६) झालेल्या चर्चेप्रमाणे गळीत हंगाम २०२३-२४ सुरु करण्यासाठी मशिनरी मेंटेनन्स करून पूर्वतयारीसाठी सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. कामावर उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
सर्व कर्मचाऱ्यांचे करण्यात आले स्वागत
यावेळी कामगारांचे वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांनी सांगितले की, गळीत हंगाम 2023-24 साठी मागील 3 ते 4 महिन्यांपासून कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे व सर्व संचालक मंडळ हे कारखाना सुरू ठेवण्यासाठी राज्य शासन, बँक व आर्थिक संस्था यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत. (Bhor news) त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मदत करण्याचे ठरविलेले असून, शासन हमीवरील कर्ज मिळण्याचे देखील कारखान्याने प्रस्ताव सादर केलेला असून शासन दरबारी लवकरच मंजुर होवून कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.
शासनाचे उपलब्ध निधीमधून शेतक-याचे उर्वरीत उसाचे बिल, तोडणी वाहतुक बील, कर्मचारी पगार, वीज बील बँकाची तडजोडीच्या रक्मा इत्यादी जुनी देणी भागवून हंगाम २०२३-२४ साठी मशिनरी देखभाल दुरुस्ती करून सर्व कामगारांना कामावर हजर होऊन मशिनरी दुरुस्ती करून घेवून लवकरच बॉयलर पुजन व १०ते १२ दिवसांत गळीत हंगाम सुरु करत आहोत. (Bhor news) कारखाना संचालक मंडळाने हंगाम 2023-24 साठी 2,00,000 मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून 2321 हेक्टर आर ऊस क्षेत्राची नोंद केली आहे. त्यापासून 1,62,000 मे. टन ऊस उपलब्ध होणार आहे. गेटकेन क्षेत्रातून 38,000 मे. टन असे एकूण 2,00,000 में टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा ट्रक, ट्रैक्टर, युवराज, बैलगाडी अशी एकूण 2000 प्रतिदिन गाळप होईल, असे नियोजन केलेले आहे.
लवकरच गाळप हंगाम सुरु करत आहे. (Bhor news) तरी सर्व शेतकरी सभासद बंधूनी आपला उस राजगड कारखान्यास देवून सहकार्य करावे, अशी माहीती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेड टाइम कीपर शामराव भिलारे यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : जनसामान्यांच्या भावनांना राजकीय स्टंट संबोधणे, हा अपमान; कुलदीप कोंडे यांची तोफ कडाडली
Bhor News : निगडे येथे पुढाऱ्यांना गावबंदी अन् मतदानावर बहिष्काराचा मराठा समाजाचा निर्णय