जीवन सोनवणे
Bhor News : भोर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी साताऱ्यात सभा आयोजित केली होती. सभेसाठी पुणे-सातारा मार्गे जात असताना, आंबेडकर यांनी कापूरहोळ येथे थांबून, कार्यकर्त्यांची अचानक भेट घेतली. यामुळे कार्यकर्त्यांना सुखद धक्काच बसला. भोर तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमींनी त्यांचे जंगी स्वागत केले.
भोर तालुक्यातील आंबेडकरप्रेमींनी केले जंगी स्वागत
प्रकाश आंबेडकर यांचा नियोजित सातारा दौरा होता. त्यानुसार पुणे-सातारा महामार्गावरून जात असताना कापूरहोळ याठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर प्रेमींनी प्रकाश आंबेडकर यांचे हार, फुलांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. या वेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते. (Bhor News ) आजचा दिवस हा भोर तालुक्यातील आंबेडकरी समाजासाठी सुवर्णअक्षराता लिहिला जाईल. वंचितांचे कैवारी, बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे पवित्र चरण आज पुण्यनगरी भोर येथे पहिल्यांदा लागले. या क्षणाचे पूर्ण श्रेय हे आपल्यासारख्या आंबेडकर घराणे प्रेमी कार्यकर्त्यांनाच जाते… बाबासाहेबांना पाहता आले नाही, पण आज तुमच्या माध्यमातून बाळासाहेब यांना तरी पाहता आले, अशा भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या वेळी सागर जगताप, मिलिंद जगताप, रुपेश जगताप, रोहित जगताप, अरुण रणखांबे, रणजित रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, विनोद गायकवाड, सतिश अडसूळ, अक्षय गायकवाड, अमर माने, आकाश कांबळे, कुणाल कांबळे, आनंद खुडे, प्रकाश ओव्हाळ,अंकुश साळुंखे, सुरज शेलार, योगेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : वरंधा घाटात मिनीबस ६० फूट खोल दरीत कोसळली ; चालकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी..