जीवन सोनवणे
Bhor News : भोर : तालुक्यातील किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी साधी पायवाटही नसल्याने लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर जाताना व येताना भिती वाटत असते. शिडीवरुन पर्यटक, नागरिकांना मोकळे जाता येता नाही, दमछाक होत असते. अशा परिस्थितीत रायरेश्वर येथील शेतकरी बंधूनी शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करत ट्रॅक्टर ४ हजार ६९४ उंच गडावर नेहण्याची किमया केली आहे.
रायरेश्वर (ता.भोर) येथील अशोक रामचंद्र जंगम व रविंद्र रामचंद्र जंगम या दोघा शेतकरी बंधूंनी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. बुधवारी (दि.१८) खरेदी केलेला ट्रॅक्टर रायरेश्वराच्या पायथ्याशी नेण्यात आला. (Bhor News) पायथ्यापाशी असलेल्या लोखंडी अरुंद शिडीवरुन ट्रक्टर नेहणे शक्यच नसल्याने त्यांनी पायथ्यापाशी ट्रक्टर उभा करुन सोबत आणलेल्या मेकॅनिकल कडून ट्रक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड, साठा असे पार्ट व अवजारे ट्रॅक्टर पासून वेगळे करण्यात आले. वेगळे केलेले पार्ट २० ते २५ ग्रामस्थांच्या मदतीने शिडीवरुन लाकडाच्या मेढी लावून,रस्सीने बांधून डोली करत नेण्यात आले. डोली करत अगदी हळूवार पणे धोका न पत्करता अतिशय कढीण परिस्थितीत शिडीवरुन पठाराच्या सपाटावर नेहण्यात आला. यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली.
रायरेश्वरावर इतिहासात पहिल्यांदाच शेतीसाठी ट्रॅक्टर
ट्रॅक्टरचे पार्ट्स व अवजारे पठारावर चढवायला बुधवारी व गुरुवारी असे दोन दिवस लागले. गुरुवारी शिडीवरुन पठारावर गेल्यावर ट्रॅक्टरचे वेगळे केलेले पार्ट जोडण्यात आले. (Bhor News) त्यानंतर ट्रॅक्टर चालू करुन गावढाणात नेण्यात आला. अशाप्रकारे स्वतःच्या शेतीसाठी रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर नेण्याचे स्वप्न साकार केले असून, आजवरच्या इतिहासात रायरेश्वरावर पहिल्यांदाच शेतीसाठी ट्रॅक्टर नेण्यात आला आहे.
रायरेश्वराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्ववरील १६ किलोमीटर पसरलेल्या पठारावर ३०० लोकसंख्या असून, ४५ कुटुंबे राहतात. हे ठिकाण भोरपासून २६ किमी अंतरावर असून, परिवहन मंडळाची बस कोर्ले गावापर्यंत जाते. (Bhor News) तेथून पुढे रायरेश्वराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. पायथ्याजवळ असलेल्या लोखंडी शिडीचा वापर ग्रामस्थ व पर्यटक सन १९९२ पासून करत आहेत.
पहिले चारचाकी वाहन गडावर नेण्याचा पराक्रम
पठारावर सेंद्रिय गव्हाची शेती बरोबरच नाचणी, वरईची शेती केली जाते. या शेतीची मशागत पारंपारीक मानव व बैलांच्या सहाय्याने केली जाते. (Bhor News) जग यांत्रिकीकरणात पुढे जात असताना रायरेश्वरावर मात्र, यंत्र नेहणे शक्य नसल्याने पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतू रायरेश्वरावरील अशोक व रविंद्र यांनी अखेर ट्रॅक्टरच्या रुपाने पहिले चारचाकी वाहन गडावर नेण्याचा पराक्रम केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : ना तलाठी, ना बोर्ड, ना तक्रार पेटी… किकवी तलाठी कार्यालयच गायब?
Bhor News : वरंध घाटात पुन्हा अपघात; कार ९० फूट खोल दरीत कोसळली