सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण, (पुणे) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या भिगवण स्टेशन (ता. इंदापूर) येथे तब्बल २५ वासरांना कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या टेम्पोला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या टेम्पोत असणाऱ्या २५ वासरांना अतिशय क्रूरपणे बांधून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. ही कारवाई गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल समिर युवराज झांबरे यांनी दिली आहे.
अंधाराचा फायदा घेऊन टेम्पोचालक पसार
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण स्टेशन येथून अज्ञात टेम्पोचालक टाटा कंपनीच्या निळ्या रंगाच्या इंट्रा टेम्पोमधून (एमएच ४२ एक्यू ५४९७) मधून कत्तलीसाठी जनावरे घेऊन चालला होता. हा टेम्पो पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भिगवण स्टेशन येथे वाघजकर गिरणीसमोर आला असता, भिगवण स्टेशनमधील काही तरुणांनी टेम्पो चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. (Bhigwan News) गाडी तेथेच थांबवून, अंधाराचा फायदा घेऊन टेम्पोचालक पळून गेला.
दरम्यान, गाडीमध्ये आत डोकावून पाहिले असता, या तरुणांना पाठीमागील हौद्यात कत्तलीसाठी घेऊन चाललेली २५ वासरे आढळून आली. याबद्दलची कल्पना त्यांनी भिगवण पोलीस ठाण्याला दिली असता भिगवण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पुढील रीतसर कारवाई केली. (Bhigwan News) भिगवण पोलिसांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता, या वासरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात इन्फ्रा टेम्पोवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, वासरांची सुटका केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : भिगवण येथील रास्तारोको पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Bhigwan News : …अखेर कर्मयोगी कारखान्याची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.