सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल भिगवण (ता. इंदापूर) येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के लागला आहे.
१२ वर्षे सतत १०० टक्के निकाल
सलग १२ वर्ष १०० टक्के निकाल लावण्याची अनोखी परंपरा कॉलेजने जपली आहे.
या विद्यालयाचा इयत्ता बारावीचा सायन्स विभागाचा व कॉमर्स विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे. (Bhigwan News)
विज्ञान शाखेचे पहिले तीन विद्यार्थी
१) राजनंदिनी सतीश पवार 87.05
२) स्नेहा महादेव जगताप. 84.50
३) नम्रता कल्याण घाडगे. 83.50
वाणिज्य शाखेतील पहिले तीन विद्यार्थी
१) अनिशा हरी काळे 73.33
२) वर्षा महादेव कडू. 73.00
३) ऐश्वर्या दत्तात्रय निंबाळकर. 72.67
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य सिंधू यादव, संस्थेच्या संचालक नंदा ताटे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.धर्मेंद्र धेंडे. माध्यमिक विभाग प्रमुख संगीता खाडे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. (Bhigwan News)
बारावीच्या परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ, संस्थेचे उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, संस्थेचे सचिवा प्रा. माया झोळ. संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विशाल बाबर यांनी अभिनंदन केले. (Bhigwan News)