सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : सर्व शेतकरी सभासदांना संस्थेमार्फत १२% टक्के लाभांश (डेव्हिडंट) वाटप करणार आहे. तसेच सर्व सभासदांचा पाच लाखापर्यंतचा अपघाती विमा उतरणार आहे.अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष गणपतराव यशवंत काळभोर यांनी केली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
खडकी येथील श्री दत्त विकास सेवा सहकारी सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी गणपतराव काळभोर यांनी वरील घोषणा केली. (Bhigwan News ) यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर, उपाध्यक्ष शिवाजी नांगरे,बाळासाहेब काळभोर,विश्वास काळभोर,रोहिदास खरबुजे,सुरेश सकुंडे,दिलीप काळभोर,काशिनाथ काळभोर,प्रताप महाडिक,कैलास शितोळे सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संस्थेला ३१-०३-२०२३ या वर्षांमध्ये २१ लाख ९,१३० इतका नफा झालेला आहे. येणाऱ्या वर्षात संस्था स्वतःच्या जागेमध्ये भव्य इमारत बांधणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. (Bhigwan News) संस्थेचा वार्षिक अहवाल संस्थेचे सचिव राजेंद्र आटोळे यांनी सभासद यांच्यापुढे वाचून दाखवला. सभेतील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमतानी मंजूर झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा : भूषण काळे
Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान
Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड