दौंड, (पुणे) : नात्यातील तरुणीला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या संशयावरून 5 ते 6 जणांनी लोखंडी रॉड, लाथा बुक्यानी जबर मारहाण करून व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पानवली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. 22) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे बीड सारख्या घटनेची पुनरावृत्ती दौंड मध्ये झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरु आहे. याप्रकरणी 6 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन पक्कड बोरावणे, (वय 28, व्यवसाय शेती, रा. पानवली ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बोरावणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय भगवान भांड, निखील संतोश मखर, जालींदर महादू लेंडे, गोविंद बाबुराव पिंगळे, पप्पु भगवान लेंडे व विशाल भगवान भांड (रा. सर्वजण पानवली ता. दौंड) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी अक्षय भांड याने आम च्याकडे लाईट नाही. डि.पी.ला लिंक टाकावी लागेल तर तु डी.पी. जवळ ये असे सांगीतले. यावेळी बोरावणे हा एकटा चालत गेला. यावेळी त्या ठिकाणी वरील सर्व आरोपी हे उभे होते. अक्षय याने सचिनच्या हातातील मोबाईल जमरदस्तीने हिसकावून घेतला. व निखील मखर यांचेकडे दिला. व तु माझी मेहूनीला मोबाईलवरून मॅसेज का केला” असे विचारले. यावेळी सचिन याने मी जालींदर लेंडे यांना मॅसेज केला होता. तुम्ही गैरसमज करून घेवू नका असे समजावले.
याचवेळी पप्पू लेंडे याने हातातील लोखंडी रॉड, अक्षय याने त्याचे हातात घेवून डावे पायाचे नडगीवर मारले. विशाल भांड व निखील मखर याने रॉड डोक्यात मारायला उगारला मात्र हातात हवेत झेलला त्यामुळे उजवे हाताचे अंगठ्या शेजारील बोटाला जबर मार लागला. त्यावेळी निखील मखर म्हणाला की, तुझा आज मर्डर करतो. यावेळी त्यांचे गाडीवर बसवले व त्यानंतर गोविंद पिंगळे याने लोखंडी रॉडने मारहान करून शिवीगाळ दमदाटी केली.
यावेळी सचिन बोरावणेला गाडीवर जबरदस्तीने बसवून शिवतक्रार म्हाळुंगीकडे जाणारे डॅमजवळील फॉरेस्ट मध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावले की, तुला आता आम्ही आपले पानवलीचे चौकामध्ये नेणार आहे तेथे मोबाईलवर तुझे व्हिडीओ करणार आहे. त्यामध्ये तु मॅसेज केलेचे मान्य करणार आहे. आणि आम्हाविरूदध पोलीसात तक्रार देणार नाही असे धमकावले. त्यानंतर आरोपींनी पानवली चौकामध्ये नेऊन निखील मखर याने त्याचे मोबाईलचा व्हिडीओ कॅमेरा चालू करून बोलावण्यास भाग पडले व व्हिडीओ केला. त्यानंतर ते सर्वजन निघून गेले.
दरम्यान, काही वेळाने पोलीस पोहोचले व यवत येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शिक्रापुर (ता. शिरूर) येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर मारहाणीत सचिन बोरावणे यांच्या मांडीचे पायाचे नडगीचे हाड फॅक्चर झाले आहे. तसेच उजवे हाताचे अंगठ्याजवळील बोटाचे हाड फॅक्चर झाले असून मणक्याला मार लागला आहे. याप्रकरणी सचिन बोरावणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना पोलिसांनी अटक केली असून दोघेजण अद्याप फरार आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.