राहुलकुमार अवचट
यवत : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी यासाठी कुल यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्याद्वारे दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशांचे वाटप आमदार ॲड. राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये ऑक्टोबर २०२२ रोजी रावणगाव (ता. दौंड) येथे ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या ३ मजूर भगिनींच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत स्व. रेश्मा भागुजी पानसरे (रा. रावणगाव), स्व. सुरेखा बाबासो पानसरे (रा. रावणगाव), स्व.अश्विनी प्रमोद आटोळे (रा. रावणगाव), स्व. मारुती गुलाब दिवेकर (रा. पारगाव), स्व. विलास अर्जुन माने (रा. हिंगणीबेर्डी), स्व. चंद्रकांत बबन रांधवन (रा. रावणगाव), स्व. दिनकर गांडले (रा. पारगाव), स्व. सचिन भीमराव ताम्हाणे (रा. ताम्हणवाडी), स्व. संकेत सदाशिव म्हेत्रे (रा. बोरीऐंदी), स्व. विष्णू मुरलीधर पाचपुते (रा. बोरीबेल), स्व. स्वप्निल बाळासाहेब दरेकर (रा. बोरीऐंदी), स्व. शंकर काशिनाथ काळे (रा. मलठण), स्व. मनोहर विठ्ठल दिवेकर (रा. पाटस), स्व. संजय नरहरी शिंदे (रा. हातवळण), स्व. प्रफुल्ल अर्जुन शितोळे (रा. कुसेगाव), स्व. अरविंद मुगुटराव भगत (रा. वासुंदे), स्व. पोपट भागुजी मरगळे (रा. मेरगळवाडी), स्व. सुदाम मुगुटराव शेळके (रा. केडगाव), स्व. संपत कोंडीबा चौधरी (रा. खोर) या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली आहे.
या वेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अरुण आटोळे, भाजपा नेते तानाजी दिवेकर, भीमा-पाटसचे संचालक विकास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.