लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १६ वा वर्धापनदिन तथा संस्थेचे संस्थापक चेअरमन नानासाहेब कासुर्डे यांचा ७२ वा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सत्यनारायण पूजा व स्कॉलरशिप विद्यार्थी व संस्थेचे उत्कृष्ट खातेदार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, आर. बी. आयचे सेवानिवृत्त अधिकारी अविनाश जोशी, उद्योजक मयूर व्होरा, लेखक जगन्नाथ शिंदे, माजी नगराध्यक्षा परवीण मेमन, अनिता चोपडे, माजी नगरसेविका निता कासुर्डे, हेमा गोळे, रेखा जानकर, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे, दिलावर बागवान, राजेश्री सणस, व्हा.चेअरमन रमेश खरात, संचालक तानाजी भिलारे, अंजना चौरसिया, प्रतिभा कासुर्डे, विजय कासुर्डे, दिलिप टेके, सुर्यकांत गोळे, अविनाश माने, विजय कांबळे, सचिन वाडकर व्यवस्थापक विक्रम पोरे, कर्मचारी फिरदौस शेख, कल्याणी कांबळे, विजय कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र राजपुरे म्हणाले श्री घाटजाई नागरी पतसंस्थेने आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून आर्थिक व्यवहार सुरू ठेवला आहे.संस्थेने सहकारातील सामूहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञानाचा वापर करावा.
यावेळी उपस्थितांनी संस्थेचे संस्थापक चेअरमन नानासाहेब कासुर्डे यांचे अभिष्टचिंतन करून संस्थेच्या वाढीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आर.बी.आयचे सेवानिवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांचे मार्गदर्शन झाले.सुत्रसंचलन व आभार प्रमोद पवार यांनी मानले.