राजू देवडे
Ambegaon News : लोणी-धामणी : वडगावपीर-मांदळेवाडी (ता. आंबेगाव) या दोन गावांसाठी खेड एसटी डेपोमार्फत दोन एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून दोन एसटी बस सुरु झाल्याची माहिती माजी सरपंच संजय पोखरकर यांनी दिली.
विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना फायदा होणार
मंचरवरून संध्याकाळी सहा वाजता ही एसटी बस निघेल. पेठ-पारगाव-वाफगाव-पाबळ-लोणी-वडगावपीर मार्गे मांदळेवाडी येथे आठ वाजता पोहोचेल व मुक्काम करेल. दुसऱ्या दिवशी ही एसटी बस सकाळी साडेसहा वाजता मांदळेवाडी-वडगावपीर-लोणी-पाबळ-वाफगाव-पेठ पारगाव मार्गे मंचरला साडेसात वाजता पोहोचेल. (Ambegaon News) तसेच दुपारी खेडवरून १२.३० ला एसटी बस निघेल. कन्हेरसर-पाबळ-लोणीमार्गे वडगावपीर येथे एसटी बस येईल व दहा-पंधरा मिनिटे थांबून ही एसटी बस वरील मार्गे खेडला पोहोचेल.
अशा दोन एसटी बस सुरु झाल्यामुळे शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. या एसटी बसेस सुरु झाल्यामुळे खेड एसटी डेपोचे व्यवस्थापक तुकाराम पवळे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. (Ambegaon News) तसेच रविवारी (ता. ८) सकाळी वडगावपीर येथील ग्रामस्थ रमेश आदक, योगेश आदक, सुखदेव आदक, तुषार आदक, शंकर आदक, माऊली साबळे यांनी चालक संतोष लांडे व वाहक नंदू चपटे यांचा सत्कार केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : मुलामुलींवर भारतीय संस्कृतीप्रमाणे संस्कार करावे; अशोक महाराज शिंदे यांचं आवाहन