Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambegaon News : डिंभे कॉलनी पोस्ट ऑफिसचे नवीन सुसज्ज जागेत स्थलांतर; गेल्या ३८ वर्षांपासून होते सेवेत

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 October 2023, 17:59

विशाल कदम
Ambegaon News : पुणे  : सध्या डिंभे कॉलनी परिसरात सिंचन विभागाचे कोणतेही कामगार व कर्मचारी राहत नसल्याने डिंभे कॉलनी येथील पोस्ट ऑफिसचे डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) गावठाणातील सुसज्ज जागेत स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली.

अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या हस्ते डाकघर कार्यालयाचे उद्घाटन

डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) गावठाणातील सुसज्ज जागेत स्थलांतरीत करण्यात आलेल्या डाकघर कार्यालयाचे उद्घाटन अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता.०३) करण्यात आले. (Ambegaon News) यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या सदस्य रुपाली जगदाळे, डिंभे खुर्दच्या सरपंच शिला लोहकरे, प्रवीण कोकणे, गणेश कसबे पाटील, तुकाराम राक्षे, लक्ष्मण राक्षे, भगवान राक्षे, पुनाजी करवडे, डाक निरीक्षक पी. टी. ओगाडे, बॅकटेश देशपांडे, मछिद्र उगले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बाळकृष्ण एरंडे म्हणाले, ‘पोस्ट ऑफिसमध्ये अनेक लघु बचत योजना जनतेच्या सोयीसाठी केंद्र सरकारद्वारा चालविल्या जात आहेत. यामध्ये बचत खाते, आरडी, सुकन्या समृद्धी योजना, मासिक प्राप्ती योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पी.पी.एफ., राष्ट्रीय बचत पत्रे, किसान विकास पत्रे इ. पोस्ट ऑफिस बचत योजना या लोकाभिमुख योजना चालविल्या जातात. (Ambegaon News) या योजना सामान्य जनतेच्या सोईच्या व फायद्याच्या असतात. तसेच त्यावर मिळणारे व्याज हे राष्ट्रीयकृत/खाजगी बँकाच्या तुलनेने जास्त असते. म्हणून जनतेकडून अशा योजनांना चांगला प्रतिसाद मिळतो’.

दरम्यान, भारत सरकारने महिलांसाठी नवीन ‘महिला सम्मान बचत पत्र’ ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु केली आहे. त्यावर ७.५% दराने कंपाउंड पद्धतीने महिलांना व्याज मिळते. याची सुरुवात म्हणून गावच्या सरपंचांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेचे खाते उघडले आहे. (Ambegaon News) या योजनेचा जास्तीत जास्त महिला व पालकांनी आपल्या मुलीसाठी व स्वतःसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

डिंभे कॉलनी उपडाकघर गेल्या ३८ वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत

डिंभे कॉलनी उपडाकघर गेल्या ३८ वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत आहे. १ जानेवारी १९८५ मध्ये हे उपडाकघर सुरु करण्यात आले. तेव्हापासून हे डाकघर सिंचन विभागाने दिलेल्या वसाहतीच्या जागेमध्ये ग्राहकांना अविरत सेवा देत आहे. पोस्ट ऑफिस उघडण्याचा उद्देश त्यावेळेस एकच होता की, सिंचन वसाहत विभागातील कामगार लोकांना व कर्मचाऱ्यांना डाक विभागाच्या सेवा मिळाव्यात. या डाकघरामुळे अनेकांना मोठा फायदा झाला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ambegaon News : मुलामुलींवर भारतीय संस्कृतीप्रमाणे संस्कार करावे; अशोक महाराज शिंदे यांचं आवाहन

Ambegaon News : भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी

Ambegaon News : रोडेवाडी फाटा चौकात विजेचे खांब लावा – शिवसेना शाखाप्रमुख विकास गायकवाड यांची मागणी..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07
Next Post

Pimpri News : तळवडे ते देहू फाटा रस्त्यासाठी आमदार लांडगे यांचा पुढाकार; अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.