विशाल कदम
Ambegaon News : पुणे : सध्या डिंभे कॉलनी परिसरात सिंचन विभागाचे कोणतेही कामगार व कर्मचारी राहत नसल्याने डिंभे कॉलनी येथील पोस्ट ऑफिसचे डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) गावठाणातील सुसज्ज जागेत स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली.
अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या हस्ते डाकघर कार्यालयाचे उद्घाटन
डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) गावठाणातील सुसज्ज जागेत स्थलांतरीत करण्यात आलेल्या डाकघर कार्यालयाचे उद्घाटन अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता.०३) करण्यात आले. (Ambegaon News) यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या सदस्य रुपाली जगदाळे, डिंभे खुर्दच्या सरपंच शिला लोहकरे, प्रवीण कोकणे, गणेश कसबे पाटील, तुकाराम राक्षे, लक्ष्मण राक्षे, भगवान राक्षे, पुनाजी करवडे, डाक निरीक्षक पी. टी. ओगाडे, बॅकटेश देशपांडे, मछिद्र उगले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळकृष्ण एरंडे म्हणाले, ‘पोस्ट ऑफिसमध्ये अनेक लघु बचत योजना जनतेच्या सोयीसाठी केंद्र सरकारद्वारा चालविल्या जात आहेत. यामध्ये बचत खाते, आरडी, सुकन्या समृद्धी योजना, मासिक प्राप्ती योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पी.पी.एफ., राष्ट्रीय बचत पत्रे, किसान विकास पत्रे इ. पोस्ट ऑफिस बचत योजना या लोकाभिमुख योजना चालविल्या जातात. (Ambegaon News) या योजना सामान्य जनतेच्या सोईच्या व फायद्याच्या असतात. तसेच त्यावर मिळणारे व्याज हे राष्ट्रीयकृत/खाजगी बँकाच्या तुलनेने जास्त असते. म्हणून जनतेकडून अशा योजनांना चांगला प्रतिसाद मिळतो’.
दरम्यान, भारत सरकारने महिलांसाठी नवीन ‘महिला सम्मान बचत पत्र’ ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु केली आहे. त्यावर ७.५% दराने कंपाउंड पद्धतीने महिलांना व्याज मिळते. याची सुरुवात म्हणून गावच्या सरपंचांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेचे खाते उघडले आहे. (Ambegaon News) या योजनेचा जास्तीत जास्त महिला व पालकांनी आपल्या मुलीसाठी व स्वतःसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
डिंभे कॉलनी उपडाकघर गेल्या ३८ वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत
डिंभे कॉलनी उपडाकघर गेल्या ३८ वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत आहे. १ जानेवारी १९८५ मध्ये हे उपडाकघर सुरु करण्यात आले. तेव्हापासून हे डाकघर सिंचन विभागाने दिलेल्या वसाहतीच्या जागेमध्ये ग्राहकांना अविरत सेवा देत आहे. पोस्ट ऑफिस उघडण्याचा उद्देश त्यावेळेस एकच होता की, सिंचन वसाहत विभागातील कामगार लोकांना व कर्मचाऱ्यांना डाक विभागाच्या सेवा मिळाव्यात. या डाकघरामुळे अनेकांना मोठा फायदा झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : मुलामुलींवर भारतीय संस्कृतीप्रमाणे संस्कार करावे; अशोक महाराज शिंदे यांचं आवाहन
Ambegaon News : भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी