योगेश पडवळ
Ambegaon News : पाबळ, (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडीफाटा चौकात विजेचे खांब लावून हा भाग प्रकाशमान करण्याची मागणी येथील शिवसेना शाखाप्रमुख विकास गायकवाड व ग्रामस्थांनी केली आहे.
या भागातील रोडेवस्ती, टाकळकरवस्ती, घोलपवस्ती या ठिकाणी रस्त्यावर विजेची सुवीधा नाही. बेल्हा जेजुरी महामार्ग व अष्टविनायक महामार्ग या चौकातुन जातो. (Ambegaon News) या महामार्गावरील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मागील दोन वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. या परिसरामध्ये बिबट्या वावर वाढलेला आहे. (Ambegaon News) रस्त्यावर विजेची सुवीधा नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले असून या भागात रस्त्यावर विजेची सुवीधा होणे गरजेचे आहे.
दरम्यान, रोडेवाडी फाटा चौकात वाहतूक वाढल्याने या ठिकाणी दुकाणांची गर्दी वाढलेली पहावयास मिळते. या रोडेवाडीफाटा चौकात रस्त्यावर विजेची सुविधा होणे गरजेचे आहे. (Ambegaon News) विज नसल्याने व्यावसायिकांना पण रात्रीची भीती वाटते.
रस्त्यावर वाहतुकीची गर्दी..
शिवसेना शाखा प्रमुख गायकवाड म्हणाले की, या चौकात रस्त्यावरची विजेची सुवीधा होणे गरजेचे आहे. जर अशी सुवीधा झाली तर दुकाने व व्यवसायीकांना भीती निर्माण होणार नाही. (Ambegaon News) व्यवसायीकांचे व्यवसाय वाढीला लागतील. अंधारात बिबट्या पासून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले थोपविण्यास मदत होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Aambegaon News : मान्सूनच्या परतीच्या पावसाने आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा