राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : धामणी (ता. आंबेगाव) परिसरातील पहाडदरा, शिरदाळे गावांमधील जिओ कंपनीची मोबाईल सेवा विस्कळित झाली आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने धामणी, पहाडदरा, शिरदाळे परिसरातील ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
ग्रामस्थ संपर्क क्षेत्राबाहेर
धामणी परिसरातील ग्रामस्थांना सेवा देण्यासाठी जिओ कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले. प्रारंभी धडाकेबाज सुरुवात करुन परिसरातील ग्रामस्थांना आकर्षित केले. (Ambegaon News) त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी जिओची सेवा घेतली. काहींनी पोर्टल करुन घेतले. मात्र, काही दिवसांपासून जिओ सेवा वारंवार खंडित होताना दिसत आहे. याचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे.
या भागातील ग्राहकांनी इंटरनेट सुविधा मिळविण्यासाठी सिम खरेदी केले, पण काही दिवसांपासून या सेवेत खंड का पडत आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Ambegaon News) दर महिन्याला बिलाचे पैसे भरायचे, मात्र सेवा नीट मिळत नाही, त्यामुळे कंपनीचे टॉवर काय कामाचे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
दरम्यान, जीओ कंपनीकडून लवकरात लवकर शाश्वत नेटवर्कची सोय करावी अशी मागणी शिरदाळेचे माजी उपसरपंच मयूर सरडे, पहाडदरा येथील युवक कार्यकर्ते संकेत वायकर यांनी केली आहे.
गेल्या चोवीस तासांहून अधिक काळ नेटवर्क नसल्याने नागरिकांचा एकमेकांशी संपर्क साधणे अडचणीचे ठरत आहे. परिसरात जिओधारक ग्राहक जास्त असल्याने, अडचणी वाढत आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीने लवकरात लवकर सेवा सुरळीत करावी. तसेच भविष्यात अशा अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
– रेश्मा बोऱ्हाडे, सरपंच, धामणी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : विविध उपक्रम राबवत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Ambegaon News : श्री शिवाजी विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
Ambegaon News : शिवसेनेचे (उबाठा) पुणे जिल्हा संघटक अविनाश रहाणे अनंतात विलीन