Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : राहुमध्ये ढोल, ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बैलांची वाजतगाजत मिरवणूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 October 2023, 14:30

जीवन शेंडकर

Yavat News  : यवत : शेतकऱ्यांसोबत वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. या दिवसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. दौंड तालुक्यातील राहू परिसरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. राहू गावाला प्रदक्षिणा मारत बैलजोडीची ढोल, ताशा, तुतारी, डीजेच्या तालात गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.

कुल कुटंबियांनी केले बैलजोडीचे पूजन

या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकले जाते. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.(Yavat News ) गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो.

प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.

 

बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. (Yavat News ) महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी निवासस्थानापासून दोन किलोमीटर राहू गावाला प्रदक्षिणा मारत बैलजोडीची ढोल, ताशा, तुतारी, डीजेच्या तालात गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढली.

माजी आमदार रंजना सुभाष कुल, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष कांचन राहुल कुल यांनी बैलजोडीचे पूजन करून नैवेद्य दिला. याप्रसंगी प्रज्वल शिंदे, नवनाथ इंगळे, मयूर शेलार, समर्थ चव्हाण, प्रद्युम्न बंड, आदित्य काळे आदी मित्रपरिवार नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : बैलपोळा सणावर यंदा दुष्काळाचे सावट; रंगीबेरंगी साहित्याने यवत बाजारपेठ सजली; परंतु मागणीत घट

Yavat News : केडगाव-खुटबाव रस्त्यावरील मोरीची तत्काळ दुरुस्ती करा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी

Yavat News : जलपर्णी समस्या व अतिरिक्त पाणी वापराबाबत सकारात्मक चर्चा; आमदार राहुल कुल यांची माहिती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

Wednesday, 30 September 2026, 14:11

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

Wednesday, 30 September 2026, 14:01
Next Post

Pune news : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष; तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार; कारवाईची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp