योगेश पडवळ
Ambegaon News : पाबळ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २६) दुपारी तीन वाजता कारखान्याचे संस्थापक संचालक, सहकारमंत्री दिलीप दत्तात्रय वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची असणार प्रमुख उपस्थिती
वार्षिक सभेमध्ये मागील सभेचा कामकाज वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेचा सन २०२२-२३ वर्षासाठीचा कामकाज अहवाल, नफा-तोटा पत्रक व ३१ मार्च रोजीचा ताळेबंद स्वीकारणे व मंजूर करणे, २०२२-२३ वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमा खर्चास मान्यता देणे, (Ambegaon News) सन २०२३-२४ वर्षासाठी संचालक मंडळाने सादर केलेल्या भांडवली व महसुली अंदाजपत्रकाची, सन २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व सन २०२१-२२ वर्षाचा लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे, सन २०२३-२४ वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक व शुल्क ठरविणे, भाग विकास निधी विनियोगास मान्यता देणे, जुनी मशिनरी व स्क्रॅप मटेरिअल विक्रीस, स्थापत्य भांडवली कामाच्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Aambegaon News : मान्सूनच्या परतीच्या पावसाने आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा