लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेल्वे स्थानकाशेजारी राहणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) दुपारी उघडकीस आली आहे.
रवींद्र राजेंद्र कुंदेकर (वय – ३६, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र कुंदेकर याने का आत्महत्या केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनास्थळी रेल्वे पोलीस व कर्मचारी दाखल झाले असून, पुढील कार्यवाही सुरु आहे. त्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.
दोन दिवसांत दोन आत्महत्या..
कदमवाकवस्ती येथील पिटर थॉमस भोसले याने शुक्रवारी (ता. ७) राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तसेच शुक्रवारी (ता. ८) रवींद्र राजेंद्र कुंदेकर यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. दोघांनीही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.