पुणे : सहज ध्यान शिबीरासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे गंठण मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून चोरुन नेले. आंबेगाव येथे हा प्रकार घडला.
याबाबत शेवाळवाडीतील एका ५८ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार आंबेगाव येथील मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधाकृष्ण गार्डनसमोर रविवारी दुपारी एक वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहजयोग ध्यान धारणा शिबिरासाठी आल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे २५ ग्रॅम सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरुन नेले. या प्रकरणाचा अधिक तसाप सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.