उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) हद्दीतील इनामदार वस्ती येथे राहणाऱ्या एका 36 वर्षीय परप्रांतीय तरुणाने राहत्या घरी फॅनच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 28) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरज ननहक्के कुमार (वय 36, रा. इनामदार वस्ती शिवा फार्म, कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कुमार हा कोरेगाव मूळ येथील शिवा फार्म येथे राहण्यास होता. बुधवारी त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याचे निदर्शानास आले. त्याला तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच निधन झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली होती. त्यानुसार मरनोत्तर पंचनामा, अॅडव्हान्स सर्टीफिकेट टपालाने प्राप्त झाल्याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मृत दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सस्ते करीत आहेत.