लोणीकंद: लोणीकंद येथे सात क्रशरवर पोलीसांनी कारवाई करत ते सील केले आहेत. काही दिवसांपूर्वी भावडी येथील क्रशरवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर लोणीकंद येथे सुद्धा अनेक क्रेशर नियम पाळत नसल्याचे उघडकीस आले आहे. क्रशर हे अनाधिकृतपणे सुरु असल्याबाबत माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी तहसीलदार तृप्ती कोलते यांना याविषयी माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी कारवाई आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. 1) कारवाई करून 7 क्रेशर क्रशर सील करण्यात आले आहेत.
वाघोली, लोणीकंद, बकोरी, भावडी, आळंदी फाटा या परिसरात लोकवस्ती खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हजारो डंपर या नगररोडवर वाहतूक करत असतात. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत. बेशिस्त डंपर चालकांमुळे रोजच अपघात घडत आहेत. अनेक नागरीकांना त्यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.
राजेश पोरवाल, श्रीकांत गांधी, राहुल पवळे,सुशील धुत, सदाशिव झुरुंगे, पाटील कंन्ट्रक्शन, आर.जे.स्टोन यांच्यावर कारवाई करुन क्रशर सिल करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई तृप्ती कोलते (तहसीलदार हवेली), संदिप झिंगाडे (मंडल अधिकारी), संजय गारकर तलाठी, पोलिस कर्मचारी यांनी केली आहे
दरम्यान, नागरिकांनी सदर परिसरातील दगड खानी, क्रशर बंद करण्यासाठी तक्रारी केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले होते. फक्त कारवाई न करता संबंधित सर्व क्रशर मालकांवर गुन्हे दाखल करत कारवाईत सातत्य ठेवले पाहिजे, असेही वारघडे यांनी सांगितले.
.