Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापूर वाडा गावातील आकांक्षा ज्वेलर्सच्या मालकाजवळील ६ लाख ५८ हजार रुपयांचे दागिने रात्रीचे वेळी चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे (ग्रामीन) शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय – २५, रा. सहकारनगर, आण्णा भाऊ साठे वसाहत नं. ०२), निखिल भगवंत कांबळे (वय २८, रा. आई माता मंदिर, लेन नं. ०६, बिबवेनगर), निलेश दशरथ झांजे (वय २५, रा. वडगाव झांजे, भैरवनाथ मंदिराजवळ, ता. वेल्हे), शफीक मकसूद हावरी वय १९ (रा. निलकमल सोसायटी इंदीरानगर कुंभारवाडा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून गुन्हयातील चोरी गेलेले साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे व तीन किलो ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापूर वाडा गावात यशवंत राजाराम महामुनी यांचे आकांक्षा ज्वेलर्सच्या नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. रोजच्या प्रमाणे दुकानातील सोने चांदीचे दागिने घेवून घरी जात असताना कोंढणपूर रोडवर दोन पल्सर मोटार सायकलवरील अनोळखी इसमांनी त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांचे ताब्यातील सोने-चांदीचे दागिने पळवून नेहले होते. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली व माहितीच्या अनुशंघाने सराईत गुन्हेगार निलेश डिंबळे याने त्याचे साथीदार रोहित साठे, निखिल कांबळे, साहील पटेल, निलेश झांजे, व इतरांचे मदतीने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून आरोपी रोहित प्रकाश साठे, निखिल कांबळे, निलेश झांजे, शफीक हावरी यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी गेलेले साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे व तीन किलोग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे आण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस अंमलदार राहुल कोल्हे हे करत आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजित भुजबळ, राहुल घुबे, दत्ता तांबे, निलेश शिंदे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, धिरज जाधव, अक्षय सुपे यांनी केली आहे.