उरुळी कांचन, (पुणे) : केंद्रीय अर्थसंकल्पात अमृत भारत स्टेशन योजनेच्या दुसऱ्या टप्यात पुणे रेल्वे विभागातील रेल्वेस्थानकांना जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये हडपसर, उरुळी कांचन आणि केडगाव या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. यासाठी १२.८६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च होणार आहे.
पुणे रेल्वेस्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वेस्थानक विकसित करण्यात येणार आहे. या रेल्वेस्थानकासाठी नवीन इमारतीची तरतूद केली आहे. कार्यालय, व्हीआयपी लाऊंज, पहिला व द्वितीय श्रेणी विश्रांती कक्ष, कॅन्टीन कॅफेटेरिया, क्लॉक रूम, सुधारित स्वच्छतागृह, आरपीएफ कार्यालय, पोस्ट कार्यालय, पार्किंग सुविधा, पार्किंगपासून प्रवेशद्वारापर्यंत पादचारी मार्ग, लिफ्ट, रॅम एस्केलेअर, द्विव्यांगांसाठी सुविधा, अतिरिक्त आसनव्यवस्था अशा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, इतर रेल्वेस्थानकांचा दर्शनी भाग सुधारणेसह प्रवेशद्वार आणि पोर्टिकोची तरतूद केली जाणार आहे. पार्किंग सुविधा, तसेच पार्किंगपासून प्रवेशद्वारापर्यंत आच्छादित पादचारी मार्ग, आसन सुविधांची क्षमता वाढ, संपूर्ण फलाट आच्छादित करणे, द्विव्यांगांसाठी फ्रेंडली स्वच्छतागृह, कोच इंडिकेशन बोर्डची तरतूद, व्हिडीओ डिस्प्ले युनिट बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण, विश्रांती कक्षाचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा अशी कामे केली जाणार आहेत.
या कामांचा समावेश
1. दर्शनी भाग सुधारणेसह मुख्य प्रवेशद्वार, पोर्टिकोची तरतूद.
2. पार्किंगच्या सुविधेसह प्रदक्षिणा क्षेत्राचा विकास आणि मुख्य प्रवेशद्वारावर लँडस्केपिंग तसेच पार्किंगपासून प्रवेशद्वार लॉबीपर्यंत आच्छादित पादचारी मार्ग.
3. प्लॅटफॉर्मच्या पृष्ठभागाच्या सुधारणेसह प्लॅटफॉर्मवर (अंदाजे 6500 चौ.मी.) संपूर्ण कव्हरची तरतूद.
4. वेटिंग रूम आणि प्लॅटफॉर्ममध्ये बसण्याची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त मॉड्यूलर फर्निचरची तरतूद.
5. पाणी पुरवठा व्यवस्थेच्या वाढीसह नवीन सुधारित शौचालये आणि वॉटर बूथची तरतूद.
6. सध्याच्या FOB वर 03 रॅम्प आणि स्वतंत्र पार्किंग यासारख्या इतर सुविधांसह दिव्यांगजनांसाठी अनुकूल शौचालये आणि वॉटर बूथची तरतूद.
7. सर्व खोल्या फिरणारे क्षेत्र इ.सह संपूर्ण स्टेशन परिसर प्रकाशमान करण्यासाठी सुधारणा.
8. प्रवाशांच्या सोयीसाठी कोच इंडिकेशन बोर्ड, व्हिडिओ डिस्प्ले युनिटसह ट्रेन माहिती प्रणाली आणि सुधारित चिन्हांची तरतूद
9. सध्याचे बुकिंग ऑफिस, एंट्रन्स लॉबी, वेटिंग रूम, वॉटर बूथ, टॉयलेटचे नूतनीकर