राहुलकुमार अवचट
यवत : शिरुर – सातारा महामार्गावर चौफुला येथे कालव्यावरच एक मालवाहतुक ट्रक बंद पडल्याने दोंन्ही बाजुस १ कि.मी. पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
चौफुला येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व शिरुर – सातारा राज्य मार्ग एकत्र येत असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते कालव्यावर असलेला पुल अरुंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असते. आज सायंकाळी अचानक ट्रक पुलावरच बंद पडल्याने वाहनचालकांना २० ते ३० मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
या रस्त्यावर अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने ही परिस्थिती अनेक वेळा निर्माण होत असते.
अवजड वाहने चारही बाजूने वाहने येत असल्याने वाहनांची प्रचंड कोंडी होते. यापरिसरात कायमस्वरुपी वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक कोंडीत वाहने अडकतात.
दरम्यान, कालव्यावर पुल अरुंद असल्याने ही समस्या अधिक वेळा निर्माण होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले यासाठी पुलाची रुंदी वाढवावी अशी मागणी वाहन चालक व परिसरातील नागरिक करत आहेत.