Vaduj News : वडूज: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडरी गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव याचा खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आक्रमक झाले आहेत. (Republicans are aggressive in the case of Akshay Bhalerao murder)
घटनेचा तीव्र निषेध करत तहसीलदारांना निवेदन
भीमसैनिक अक्षय भालेराव हा चळवळीत व वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता व अशा कार्यकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी करण्यात पुढाकार घेतला. (Vaduj News ) मात्र त्याचा खून करण्यात आला. याचा रिपब्लिकन पक्ष (आठवले) या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत खटाव तहसील कार्यलयात एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड व खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले. यावेळी 20 जुन रोजी होणाऱ्या जनअक्रोश मोर्चा संबंधी देखील त्यांनी मार्गदर्शन केले. (Vaduj News ) सर्व रिपाइ कार्यकर्त्यांनी या मोर्चा साठी खटाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील होण्याचा निर्धार करण्यात आला .
निवेदन देताना स्वप्नील गायकवाड, खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश, सातारा जिल्हा उपाध्यक्ष मयूर बनसोडे ,महिला आघाडी अध्यक्ष अनिता तोरणे,सागर जाधव, आकाश खांडेकर, संतोष भंडारे, अजित कंठे व रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : वडूज बसस्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय
Vaduj News : खटाव मध्ये लढतात गावे सोळा, आता घालू नये श्रेयवादाचा खोडा
Vaduj News : निष्क्रिय कर्मचाऱ्या विरोधात मान्यवरांनी वडूज नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांना विचारला जाब