(Uruli Kanchan News) उरुळी कांचन : हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली अतुल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच सुभाष गायकवाड यांनी राजिनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. या पदासाठी निवडणूक प्रक्रिया हिंगणगावच्या विद्यमान सरपंच अर्पणा ज्ञानेश्वर थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
रुपाली गायकवाड यांचा एकमेव अर्ज…!
या निवडणुकीत रुपाली गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्पणा थोरात यांनी उपसरपंचपदी रुपाली गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक सुवर्णा लोंढे यांनी शासकीय कामकाज पाहिले.
यावेळी माजी सरपंच अंकुश कोतवाल, कुंडलिक अर्जुन थोरात, कुंडलिक पाटलोजी थोरात, विजय गायकवाड, माजी उपसरपंच सुखदेव कांबळे, बाळासाहेब थोरात, सुभाष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सागर थोरात, शशिकला पोपळघट, दगडु थोरात, भगवान गडदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे, माऊली थोरात, राहुल थोरात, भाऊ चव्हाण, शिक्षण कमिटी अध्यक्ष काळुराम थोरात, डॉ. रणजित कोळपे, विष्णु गायकवाड, लक्ष्मण मल्लाव व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गावाच्या विकासकामे करीत असताना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली गायकवाड यांनी केले आहे.