सागर जगदाळे
भिगवण: आज समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती खऱ्या अर्थाने भिगवण ग्रामपंचायतीत साजरी करण्यात आली.इंदापूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दीपिका तुषार क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सावित्रीच्या लेकीला मिळालेला आजचा हा सन्मान म्हणजे एका अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा हा गौरवच आहे.
भिगवण ग्रामपंचायतीचा संरपच पदाचा राजीनामा संरपच तानाजी वायसे यांनी १६ नोव्हेंबर रोजी दिल्याने डिसेंबर अखेर सरपंच पद हे रिक्त होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव असल्यामुळे या पदासाठी ३ जानेवारी रोजी निवड प्रक्रिया घेण्यात आली. या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य दिपीका क्षीरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने क्षीरसागर यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.यादरम्यान ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच दिपीकी क्षीरसागर क्षीरसागर यांची २०२० साली झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडून आल्या आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर गेली अडीच वर्षे सातत्यपूर्ण वॉर्डातील कामे मार्गी लावत असून त्यांना प्रशासनाबरोबर काम करण्याची कार्यपद्धतीचा चांगला अनुभव आहे. दांडगा जनसंपर्क,बेधडक, लागलीच काम मार्गाला लावणे या स्वभावामुळे ते भिगवणमध्ये प्रचलित आहे. त्यांना सरपंच पद मिळाल्याने ते नक्किच गावहिताचे चांगले विकासकामे करतील अशी आशा सर्वांना आहे.
सरपंचपदी दिपीका तुषार क्षीरसागर यांची निवड झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. या निवडी दरम्यान जेष्ठ नेते अशोक शिंदे, अजित क्षीरसागर, संजय देहाडे, जावेद शेख, संजय रायसोनी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिमन्यु खटके, मानसिंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य पराग जाधव, उपसरपंच मुमताज शेख, तानाजी वायसे, गुराप्पा पवार, दत्ता धवडे, स्मिता जाधव, रणजित भोंगळे, केशवराव भापकर, संजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. बिनविरोध निवड करण्यात आल्याने सरपंच प्रतिनिधी म्हणून प्राचार्य तुषार क्षीरसागर यांनी सहकारी सदस्यांचे आभार मानले.सुत्रसंचालन जयदिप जाधव यांनी केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार आहे. विकासात्मक कामाच्या माध्यमातून स्वतः आदर्श होण्यापेक्षा भिगवण हे गाव “आदर्श गाव” म्हणून नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच गावात पूर्णवेळ विज, शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा या मूलभूत सुविधा निर्माण करून,प्रलंबित आणि प्रास्तावित कामे तात्काळ प्रभावाने मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल.जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हर घर नल ही योजना जलदगतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी विशेष प्रयत्न असणार आहेत. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी सांगितले आहे.