Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावित्रीच्या लेकीच्या हाती भिगवण गावच्या सरपंचपदाची चावी ; दीपिका क्षीरसागर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 January 2023, 18:44

सागर जगदाळे 

भिगवण: आज समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती खऱ्या अर्थाने भिगवण ग्रामपंचायतीत साजरी करण्यात आली.इंदापूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दीपिका तुषार क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सावित्रीच्या लेकीला मिळालेला आजचा हा सन्मान म्हणजे एका अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा हा  गौरवच आहे.
भिगवण ग्रामपंचायतीचा संरपच पदाचा राजीनामा संरपच तानाजी वायसे यांनी १६ नोव्हेंबर रोजी दिल्याने डिसेंबर अखेर सरपंच पद हे रिक्त होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव असल्यामुळे या पदासाठी ३ जानेवारी रोजी निवड प्रक्रिया घेण्यात आली. या  निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य दिपीका क्षीरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने क्षीरसागर यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.यादरम्यान ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच दिपीकी क्षीरसागर क्षीरसागर यांची २०२० साली झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडून आल्या आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर  गेली अडीच वर्षे सातत्यपूर्ण  वॉर्डातील  कामे मार्गी लावत असून त्यांना प्रशासनाबरोबर काम करण्याची कार्यपद्धतीचा चांगला अनुभव आहे. दांडगा जनसंपर्क,बेधडक, लागलीच काम मार्गाला लावणे या स्वभावामुळे ते भिगवणमध्ये प्रचलित आहे. त्यांना सरपंच पद मिळाल्याने ते नक्किच गावहिताचे चांगले विकासकामे करतील अशी आशा सर्वांना आहे.

सरपंचपदी  दिपीका तुषार क्षीरसागर यांची निवड झाल्यानंतर  मोठा जल्लोष करण्यात आला. या निवडी दरम्यान जेष्ठ नेते अशोक शिंदे,  अजित क्षीरसागर, संजय देहाडे, जावेद शेख, संजय रायसोनी यांनी मनोगत व्यक्त  करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिमन्यु खटके, मानसिंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य पराग जाधव, उपसरपंच मुमताज शेख, तानाजी वायसे, गुराप्पा पवार, दत्ता धवडे, स्मिता जाधव, रणजित भोंगळे, केशवराव भापकर, संजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.  बिनविरोध निवड करण्यात आल्याने सरपंच प्रतिनिधी म्हणून प्राचार्य तुषार क्षीरसागर यांनी सहकारी सदस्यांचे आभार मानले.सुत्रसंचालन जयदिप जाधव यांनी केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार आहे. विकासात्मक कामाच्या माध्यमातून स्वतः आदर्श होण्यापेक्षा भिगवण हे गाव “आदर्श गाव” म्हणून नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच गावात पूर्णवेळ विज, शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा या मूलभूत सुविधा निर्माण करून,प्रलंबित आणि प्रास्तावित कामे तात्काळ प्रभावाने मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल.जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हर घर नल ही योजना जलदगतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी विशेष प्रयत्न असणार आहेत. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 11:42

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44
Next Post

वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये 'बालिका दिन' मोठ्या उत्साहात संपन्न ; विद्यार्थीनींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp